इंद्रराज महाविद्यालयात मतदार नोंदणी, मतदान जनजागृती अभियान

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): येथील कार्यालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने नव मतदार नोंदणी व मतदान जनजागृती अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंद्रराज महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपविभागीय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. व्यंकटेश लांब तर प्रमुख पाहुणे म्हणून सिल्लोड तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार  रूपाली सराफ हे उपस्थित होते. 

याप्रसंगी महाविद्यालय ही लोक शिक्षणाचे प्रभावी माध्यम असून यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही प्रकियेत तत्परतेने सहभाग घ्यावा. याकरिता वय वर्ष १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवावे याकरिता मतदार नमुना फॉर्म ६ भरावा तसेच सदर फॉर्म भरतांना फॉर्म हा अचूक पध्दतीने भरावा. याशिवाय आपण सर्व विद्यार्थीमित्रांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. 

आपल्या परिसरातील मतदानास पात्र असणाऱ्या व्यक्तीस ही कळवावे असे आवाहन मान्यवर अतिथींनी केले. अध्यक्षीय समारोपात उप- प्राचार्य डॉ. लांब यांनी युवकांनी जास्तीत जास्त मतदान नाव नोंदणी केली पाहिजे या उद्देशाने महाविद्यालयातील तरुण-तरुणी मतदारांना निवडणुकीचे महत्त्व सांगून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. 
सूत्रसंचालन डॉ. रूपाली बिरादार व आभार डॉ. विनोद शेळके यांनी मांडले. याप्रसंगी रासेयो. कार्यक्रम अधिकारी डॉ. मुळे, डॉ. पाटील, डॉ. म्हस्के, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, तहसील कार्यालयाचे काटकर, गुट्टेवाड व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.